Thursday, August 1, 2013

आरती लोकमान्य टिळकांची



रत्नागिरी शहरामध्ये जन्म ज्याचा झाला
बाळ गंगाधर नांव ठेविले त्याला
विद्याभ्यास याने बहुतची केला ।
विष्णूशास्त्र्यानी गुरू मंत्र दिला ॥ १ ॥
जय देव जय देव जय विघ्नहरा ।
आरती ओवाळू बाळ गंगाधरा ॥ धृ ॥
मानवरूप धरूनी बळवंत आला ।
थोर पराक्रम बाळाने केला ।
देश बांधवासी याने दाविला ।
तिन्ही लोकी ज्याचा झेंडा लागला ।। २ ॥
संसारी असूनी विरक्त झाला ।
देशासाठी ज्याने देह झिजविला ।
काळेपाणी-कारागृह ज्याने सोशिला ।
सुख दुःख सर्व समान त्याला ।। ३ ।।
जानकी मूढमतीने केले कवन ।
नसे मज बुध्दी आणि लेखन ।
जगी सर्व दुःखी झाले ते जन ।
टिळक स्वर्गी गेले आमुचे निधान ॥ ४ ॥

(वि.सू. सदर आरती माझ्या पणजी कै. जानकी घुले-अभ्यंकर यांनी रचली आहे.)