Wednesday, May 29, 2013

श्रीरामाची आरती


श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ।धृ ।
रत्नजडित मणी वर्णू काय मुकुटी ।
आरती ओवाळू चौदा भुवनांचे पती । १ ।
भरत शत्रुघन दोघे चामर ढाळीती
स्वर्गावरुनि देव पुष्प वृष्टी करीती । २ ।
कनकाचे ताठ करी धनुष्यबाण ।
मारुती हा पुढे उभा कर जोडून । ३ ।
लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
चौदा वर्षे आहार निद्रा गेलीहो त्याची । ४ ।
विष्णुदास नामा म्हणे मागणे हे किती ।
अखंडीत सेवा घडो रामचंद्राची । ५ ।

Sunday, May 26, 2013

गणपतीचा दंडवत

 दंडवत सांग माझा दंडवत सांग । धृ ।

मोरगावच्या मोरयाला । रांजणगावी गणपतीला ।
थेउरीच्या चिंतामणीला । दंडवत सांग । १ ।
लेण्याद्रीच्या गिरीजात्मजा । महडच्या वरदराजा ।
गौरीपुत्रा गजवक्त्रा । दंडवत सांग । २ ।
पालीचा बल्लाळेश्वर । ओझरीचा विघ्नेश्वर ।
सिद्धटेकच्या विनायका । दंडवत सांग । ३ ।
आगरातल्या गणपतीला । नांदगावी मोरयाला ।
कड्यावरच्या गणपतीला । दंडवत सांग । ४ ।
प्रभादेवीचा सिध्दीविनायक । वैजनाथचा षडभुजांग ।
पुळ्याच्या गणपतीला । दंडवत सांग । ५ ।
हिमालयाच्या बद्रीगणेशा । प्रयागीच्या ओम गणेशा ।
गिरीनारी रेवती गणेशा । दंडवत सांग । ६ ।
पुण्यक्षेत्री दगडुशेटचा । वसे सारसबागे मधला ।
मान पहिला कसब्याला । दंडवत सांग । ७ ।
कोकणातल्या हेदवीमधला । ढोल्या गणपती वाई मधला ।
विघ्नहर्ता सांगलीचा । दंडवत सांग । ८ । 
दंडवत सांग माझा दंडवत सांग । धृ ।

Friday, May 24, 2013

गणपतीची आरती

श्री गजवदना भक्तभूषणा
पार्वती तनया तुज नमुनी
पंचारती ही करुनी प्रार्थितो
भक्त संकटा ने हरुनी ॥ धृ ॥

मास भाद्रपद शुद्ध चतुर्थी
शुभदिनी मृण्मय तव मूर्ती
आनंदे बा आणुनी गेही
पूजन सारे जन करिती ॥ १ ॥

सिंदुरासूर दैत्य मातला 
गांजी भारत भू भारी
पाहुनी जनता भयाभीत  तै
मुक्त करिसी तू वधुनी अरी ॥ २ ॥

तोचि समय बा आज पातला
देशा आली दुर्दैना
स्वराज्य असुनी सुराज्य होईना 
त्रस्त जाहले सकल जन ॥ ३ ॥

जनी जनार्दन बल संघटना
रूपे होऊनी अवतीर्ण
वैभव शिखरी चढवि भारता 
विनवी शाहीर श्रीकृष्ण ॥ ४॥

शाहीर श्रीकृष्ण रामचंद्र घुले