अनसूयानंदना तुज ओवाळू आरती
।
अनसूयानंदना मज निज चरणी दे
रती ।। धॄ ।।
सर्वात्मा तू असोनी निजसी
बा माहुरी ।
निजदासा उध्दराया भीक्षा
कोल्हापुरी ।
करीसी तू स्नान नित्य प्रेमे
काशीपुरी ।
वससी बा विश्ववासा
सह्याद्री गिरीवरी ।। १ ।। चाल
निजभजका भेट देसी निज नामोच्चारणे
।
कली माजी बाहती तुज
दत्तायाकारणे ।
जाणुनी हे तुजपाशी केले
म्या गार्हाणे
निजचरणा दावी याहुनी नच दुसरे
मागणे ।। २ ।। चाल
यतिरुपा घेऊनी तू वससी कृष्णातटी
।
निजदासा भेट द्याया जागृत
तू संकटी ।
प्रत्यक्ष गाणगापुरी दिससी
दासा मठी ।
समजुनी हे वासुदेवा तुज
जोडी करपुटी ।। ३ ।। चाल
No comments:
Post a Comment