Wednesday, June 19, 2013

आरती दत्ताची



आरती वासुदेव यतीची भक्ता सुखकर हो साची ॥
सच्चिदानंद मूर्ति बरवी दर्शने त्रिविध ताप हरवी॥
विपत्ती दैन्य दोष नुरवी दिनावरी दया क्षमा मिरवी ॥
चाल – गर्जना दत्त दत्त करुनी दाउनी प्रचित 
      प्रगट करी चरित भाविका देत
      साक्ष गुरुची परात्पर सगुण निर्गुणाची ।। १ ॥
वासुदेवानंद स्वामी मूर्ती अघटित तेचि घडुनी आणिती ॥
हर्ष भय शोक रहित चित्ती रंगली निजानंदी मूर्ती ॥
चाल – कृपेने वारी आधी व्याधी नमिता चरण ।
      शरण जन तरीत । हरितसे ताप। बाप हा माय ।
      बहीण आमुची । वोळली माय भाविकांची ॥ २ ॥
दत्तगुरु वासुदेव सखया परिसा माझी विनती सदया ॥
करुनीया कृपेची छाया निवारा संसृती ही माया ॥
चाल- कोणी मज नाही तुम्हाविण हो सदानंद धाम  
     गोड तव नाम । देई मज प्रेम । निरंतर 
     कृपा असो तुमची । विनंती ही तव दासाची ॥ ३ ॥

No comments:

Post a Comment