Wednesday, June 19, 2013

आरती दत्ताची



आरती वासुदेव यतीची भक्ता सुखकर हो साची ॥
सच्चिदानंद मूर्ति बरवी दर्शने त्रिविध ताप हरवी॥
विपत्ती दैन्य दोष नुरवी दिनावरी दया क्षमा मिरवी ॥
चाल – गर्जना दत्त दत्त करुनी दाउनी प्रचित 
      प्रगट करी चरित भाविका देत
      साक्ष गुरुची परात्पर सगुण निर्गुणाची ।। १ ॥
वासुदेवानंद स्वामी मूर्ती अघटित तेचि घडुनी आणिती ॥
हर्ष भय शोक रहित चित्ती रंगली निजानंदी मूर्ती ॥
चाल – कृपेने वारी आधी व्याधी नमिता चरण ।
      शरण जन तरीत । हरितसे ताप। बाप हा माय ।
      बहीण आमुची । वोळली माय भाविकांची ॥ २ ॥
दत्तगुरु वासुदेव सखया परिसा माझी विनती सदया ॥
करुनीया कृपेची छाया निवारा संसृती ही माया ॥
चाल- कोणी मज नाही तुम्हाविण हो सदानंद धाम  
     गोड तव नाम । देई मज प्रेम । निरंतर 
     कृपा असो तुमची । विनंती ही तव दासाची ॥ ३ ॥

आरती रामाची



श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळु पाहु सुंदर मेघश्माम ।। धृ ।।
रत्नजडीत मणी वर्णु काय मुकुटी ।
आरती ओवाळू चौदा भुवनाचे पती ।। १ ।।
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळीती ।
स्वर्गावरुनी देव पुष्प वृष्टी करीती ।। २ ।।
कनकाचे ताठ करी धनुष्यबाण ।
मारूती हा पुढे उभा कर जोडुन ।। ३ ।।
लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची ।
चौदा वर्षे आहार निद्रा गेली हो त्याची ।। ४ ।।                                      
विष्णुदास नामा म्हणे मागणे हे किती ।
अखंडीत सेवा घडो रामचंद्राची ।। ५ ।।

Monday, June 10, 2013

आरती दत्ताची



अनसूयानंदना तुज ओवाळू आरती ।
अनसूयानंदना मज निज चरणी दे रती ।। धॄ ।।
सर्वात्मा तू असोनी निजसी बा माहुरी ।
निजदासा उध्दराया भीक्षा कोल्हापुरी ।
करीसी तू स्नान नित्य प्रेमे काशीपुरी ।
वससी बा विश्ववासा सह्याद्री गिरीवरी ।। १ ।।   चाल
निजभजका भेट देसी निज नामोच्चारणे ।
कली माजी बाहती तुज दत्तायाकारणे ।
जाणुनी हे तुजपाशी केले म्या गार्‍हाणे
निजचरणा दावी याहुनी नच दुसरे मागणे ।। २ ।।  चाल
यतिरुपा घेऊनी तू वससी कृष्णातटी ।
निजदासा भेट द्याया जागृत तू संकटी ।
प्रत्यक्ष गाणगापुरी दिससी दासा मठी ।
समजुनी हे वासुदेवा तुज जोडी करपुटी ।। ३ ।।    चाल

Sunday, June 9, 2013

कोणी नसे कुणाचे



सहवास प्रेम मैत्री। ‌हे तंत्र बोलण्याचे ।
प्रत्यक्ष वेळ येता । कोणी नसे कुणाचे ॥धृ॥
कन्या स्नुषा नृपाची । प्रत्यक्ष राम वरता ।
पिचली क्षणाक्षणाला । कारुण्यरुप सीता ।
कामी तिच्या न आले । सामर्थ्य राघवाचे ॥१॥
त्यागून सूर्यपुत्रा । कुंती पुन्हा कुमारी ।
कर्णास अनुज माता । सारेच जन्म वैरी ।
कौतुक का करावे । या रक्तबंधनाचे ॥२॥
केली उभी पणाला । द्यूतात कृष्ण भगिनी ।
सम्राट पांडवांची । रानावनात राणी ।
पती पाच देव बंधू । तरी भोग हे तियेचे ॥३॥
ठेवू नको अपेक्षा । असल्या जगाकडूनी ।
निरपेक्ष आचरीता । कर्तव्य प्रेम दोन्ही ।
मग चालू दे सुखाने । अव्हेरणे जगाचे ॥४॥
(चाल: आनंदकंद ऐसा हा हिंद देश माझा अथवा शतजन्म शोधिताना )

Saturday, June 8, 2013

दे मज आशिर्वाद अंबे ।



दे मज आशिर्वाद ‌।
जगदंबेच्या कौसल्यतेला
आतुरले मी तव दर्शनाला
तुझा ध्वनी हा मंदिरी घुमतो
सुख वाटे मज त्यात अंबे ‌ ।। ‌। ।   
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
भक्त गर्जती अती प्रेमाने
सौभाग्याची भीक मागते 
ठेवी मस्तकी हात अंबे ।। ।।